‘बरेली कि बर्फी’ची दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारीचे ‘मॅपिंग लव’ च्या माध्यमातून लेखन क्षेत्रात पाऊल; टीज़र प्रदर्शित! रूपा पब्लिकेशंस द्वारे मे 2021 ला होणार प्रकाशित!

प्रसिद्ध चित्रपटकर्ती आणि दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी लेखन क्षेत्रात प्रवेश करत असून त्यांची पहिली कादंबरी ‘मॅपिंग लव’ रूपा पब्लिकेशंस द्वारे मे 2021 ला प्रकाशित होत आहे. या आधी त्यांनी ‘निल बट्टे सन्नाटा’, ‘बरेली की बर्फी’, ‘पंगा’, ‘घर की मुरगी’ सारखे बहुचर्चित चित्रपट बनवले आहेत.

रूपा पब्लिकेशन्सने त्यांच्या सोशल मिडियावर तिच्या पहिल्या कादंबरीचा टीझर प्रसिद्ध केला असून त्यावर लिहिले आहे की,”आम्हाला हे सांगताना अत्यानंद होतो आहे की, आम्ही पुरस्कारप्राप्त आणि समीक्षकांनी गौरवलेल्या दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी यांची ‘मॅपिंग लव्ह’ ही पहिली कादंबरी मे 2021 मध्ये प्रकाशित करत आहोत. भारतातील चित्तथरारक जंगलांमध्ये वसलेल्या या मनोरंजक कहाण्या मन:स्पर्शी आहेत. एक कलाकार, लेखक आणि चित्रपट निर्माते, ज्यांचे चित्रपट ‘नील बट्टे सन्नाटा’, ‘बरेली की बर्फी’, ‘घर की मुर्गी’, ‘पंगा’ असे चित्रपट मनोरंजक आणि विचार प्रवृत्त करतात.

Filmmaker Ashwiny Iyer Tiwari turns author with 'Mapping Love'

आपल्या पहिल्या कादंबरीबद्दल बोलताना अश्विनी म्हणाल्या की, “कथाकार म्हणून प्रत्येक वेळी मला असे माध्यम महत्वाचे वाटते ज्यामुळे भावनेचे खरे सार बाहेर येईल. ‘मॅपिंग लव्ह’ ही प्रेमात पडण्यासोबतच लेखन कलेची कथा आहे. मी ती तीन वर्षांपासून हे लिहित आहे आणि रूपा प्रकाशन माझी ही पहिली कादंबरी सर्वांसमोर आणत आहे याचा मला सर्वस्वी आनंद आहे.”

‘मॅपिंग लव्ह’चे टीझर नुकतेच समोर आले आहे आणि मे 2021 मध्ये पुस्तक देखील चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आकर्षक असे हे टीजर पुस्तकाविषयीची उत्सुकता वाढवणारे आहे. अश्विनी अय्यर तिवारी आपल्यासाठी पुन्हा प्रेमाची भेट घेऊन आल्या आहेत!

Website | + posts

Leave a comment