झी-चित्रमंदिर (Zee Chitramandir) या  नवीन मराठी चित्रपट वाहिनीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि हे चॅनेल लाँचच्‍या एका आठवड्याच्‍या आतच फ्री डिश व्‍यासपीठावर पहिल्‍या क्रमांकाचे चॅनेल म्‍हणून उदयास आले आहे. मराठी-भाषिक क्षेत्रातील दोन-तृतीयांश बाजारपेठेला* व्‍यापून घेणारे झी-चित्रमंदिर महाराष्‍ट्रातील फ्री डिश व्‍यासपीठावर सर्वाधिक पाहण्‍यात आलेले चॅनेल ठरले.  (Zee Chitramandir becomes the Most Watched TV Channel on free dish in Maharashtra)

चॅनेलच्‍या सादरीकरणाच्‍यावेळी महाराष्‍ट्रामध्‍ये खूपच लोकप्रि‍य ठरलेला चित्रपट ‘सैराट’ दाखवण्यात आला, त्यानंतर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दाखवण्यात आले. 

झी-एंटरटेन्‍मेंट एंटरप्राईजेज लिमिटेडच्या नॉर्थ, वेस्ट- अँड प्रि‍मिअम चॅनेल्सचे क्लस्टर प्रमुख अमित शाह म्हणाले, ‘’आम्हाला महामारीदरम्यान झी-चित्रमंदिर चॅनेल लाँच केल्यानंतर देखील या चॅनेलला प्रेक्षकांकडून मिळालेल्‍या अभूतपूर्व प्रतिसादाचा खूप आनंद झाला आहे. फ्री डिश चॅनेल म्‍हणून झी-चित्रमंदिरने अल्पावधीतच दर्जेदार व सर्वसमावेशक चित्रपट कन्टेन्ट सादर करत महाराष्‍ट्रातील चित्रपटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.” 

चित्रपट ‘सैराट’ च्या भव्य प्रिमिअर नंतर झी-चित्रमंदिर प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिल. या श्रेणीमध्ये प्रेरणादायी चित्रपट ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ व ‘केसरी’, विनोदी चित्रट ‘आलटून पालटून’ आणि प्रेमकथा ‘गस्त’ अशा चित्रपटांचा समावेश आहे.  

Website | + posts

Leave a comment