एक असा फॉरमॅट, जो विशुद्ध प्रतिभा यशस्वीरित्या प्रेक्षकांपुढे घेऊन येतो,  हा फॉरमॅट इंडियाज गॉट टॅलेंट (India’s Got Talent) नावाने प्रचलित आहे, जे “गॉट टॅलेंट”  या आंतरराष्ट्रीय फॉरमॅटचे भारतीय रूप आहे. या भारतीय रुपाचे जनक आहेत, सायको आणि फ्रेमॅन्टल. आता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने (Sony Entertainment Television) त्याचे अधिग्रहण केले आहे. 2006 मध्ये अमेरिकाज गॉट टॅलेंटचे प्रसारण झाले, त्यानंतर 70 पेक्षा जास्त देशांमध्ये हा फॉरमॅट यशस्वीरित्या वापरण्यात आला. या फॉरमॅटमध्ये प्रतिष्ठित परीक्षकांची पॅनल देशभरातील होतकरू स्पर्धकांमधून काही स्पर्धक निवडते आणि मग अंतिम विजेता निवडण्याची जबाबदारी मात्र प्रेक्षकांकडे असते.(Sony Entertainment Television acquires rights to the format –India’s Got Talent)

आशीष गोळवलकर, (हेड- कंटेन्ट, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन) याविषयी बोलतांना म्हणाले की, “एक फॉरमॅट म्हणून इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये भरपूर क्षमता आहे. कथा बाह्य, प्रतिभा-प्रेरित रियालिटी फॉरमॅट प्रांतात हातखंडा असलेल्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनला प्रेक्षकांच्या अभिरुचीस अनुकूल कार्यक्रम सादर करण्याची आणखी एक संधी या फॉरमॅट द्वारे मिळाली आहे. फ्रेमॅन्टलकडून अधिकार मिळवून आता आम्ही इंडियाज गॉट टॅलेंटचा नवीन सीझन सादर करण्यासाठी तयारी करत आहोत. देशातील उत्कृष्ट प्रतिभा सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

फ्रेमॅन्टल, इंडियाच्या MD आराधना भोला याविषयी बोलतांना म्हणाल्या की, “जागतिक टेलिव्हिजन इतिहासात सर्वाधिक यशस्वी रियालिटी फॉरमॅट म्हणून ‘गॉट टॅलेंट’च्या नावे विक्रम नोंदलेला आहे. इंडियाज गॉट टॅलेंट या आमच्या आणखी एका यशस्वी फॉरमॅटसाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनशी हातमिळवणी करताना फ्रेममॅन्टलला आनंद होत आहे. याच्या फॉरमॅटमध्येच अंतर्भूत असलेले वैविध्य आणि समावेशकता यामुळे हा शो भारतातील लोकांच्या प्रतिभेचे यथार्थ सादरीकरण करतो. आम्हाला प्रामाणिकपणे असे वाटते की, याचे आगामी सत्र देखील वर्षानुवर्षे आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणार्‍या आमच्या प्रेक्षकांना अमर्याद मनोरंजन देत राहील.”

Website | + posts

Leave a comment