ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं वृद्धापकाळाने निधन झालं असून ते  84 वर्षांचे होते. (Actor Ravi Patwardhan Passed Away) ठाण्यातील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

रवी पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटकं, चित्रपट आणि मालिकांमध्ये काल केलं आहे. ‘अगंबाई सासूबाई’ ही रवी पटवर्धन यांची शेवटची मालिका ठरली. 1944 मध्ये वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी रवी पटवर्धन यांनी एका नाट्यमहोत्सवातील बालनाट्यात काम केलं होतं.  आरण्यक हे नाटक रवी पटवर्धन यांनी पहिल्यांदा 1974 मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केलं. त्यामध्ये त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. त्यानंतर अगदी वयाच्या 82व्या वर्षातही या नाटकात ते तीच धृतराष्ट्राची भूमिका करत होते. 

रवी पटवर्धन यांचा ६ सप्टेंबर १९३७ रोजी जन्म झाला. मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपट सृष्टी गाजवल्यानंतर रवी पटवर्धन यांनी छोट्या पडद्यावर देखील आपला ठसा उमटवला. त्यांच्या झुपकेदार मिशा आणि जरब बसवणारा आवाज हा त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाला अगदी साजेसा होता. आपल्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळे त्यांनी गावचा पाटील, पोलिस आयुक्त आणि न्यायाधीस अशाबरोबर अनेक खलनायकी भूमिका साकारल्या. पटवर्धन यांनी दीडशेहून अधिक नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी २०० हून अधिक चित्रपट केले आहेत. ‘अग्गबाई सासूबाई’ ही त्यांची शेवटची मालिका ठरली. मराठी नाटक व सिनेमाप्रमाणेच ‘तेजाब’ या हिंदी चित्रपटात त्यांनी साकारलेली वकिलाची भूमिका खूपच गाजली होती. 

काल रात्री रवी पटवर्धन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. पटवर्धन यांना मार्च महिन्यात देखील हृदयविकाराचा झटका आला होता. 

रवी पटवर्धन यांना नवरंग रुपेरी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 

Website | + posts

Leave a comment