लिजो जोस पेलसेरी दिग्दर्शित मल्याळम चित्रपट ‘जल्लीकट्टू’ ची ऑस्कर २०२१ साठी भारताचा अधिकृत सिनेमा म्हणून निवड झाली आहे. 

अँटनी वर्गीस, चेंबान विनोद जोस, सबुमन अब्दुसमद अभिनीत, ‘जल्लीकट्टू’ हा हरीश एस यांनी लिहिलेल्या ‘माओइस्ट’ नावाच्या एका छोट्या कथेवर आधारित असून, हरीश व आर. जयकुमार या दोघांनी सिनेमाच्या पटकथाचे लेखन केले आहे. समीक्षकांनी केलेली प्रचंड तारीफ व बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानंतर आता हा चित्रपट ऑस्कर साठी ‘बेस्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म’ या कॅटॅगिरी मध्ये नामांकन मिळवण्याच्या शर्यतीत दाखल झाला आहे.

‘द डीसीपल’, ‘शकुंतला देवी’, ‘शिकारा’, ‘छपाक’, ‘एके व्हर्सेस एके’, ‘भोसले’, ‘छलांग’, ‘ईब अलाय ऊ’, ‘चेकपोस्ट ‘,’ अटकन चटकन ‘,’ कामयाब ‘,’ चिंटूका बर्थडे ‘आणि’ बिटरस्वीट ‘, गुलाबो सीताबो, बुलबुल, दि स्काय इज पिंक, सिरीयस मेन, गुंजन सक्सेना इत्यादी एकूण २७ चित्रपटांमधून ‘जल्लीकट्टू’ ची निवड झाली आहे.

गेल्या वर्षी या कॅटॅगिरी मध्ये भारतातर्फे गल्ली बॉय हा सिनेमा पाठविण्यात आला होता परंतु तो नामांकन मिळवू शकला नाही. अमेरिकेबाहेर इतर कुठल्याही देशांमध्ये निर्मित व इंग्रजी भाषेव्यतिरिक्त इतर भाषांमध्ये बनविलेल्या सिनेमाची निवड या कॅटॅगिरी मध्ये केली जाते.

९३ वा ऑस्कर पुरस्कार प्रदान समारंभ २५ एप्रिल २०२१ रोजी होणार आहे.

जल्लीकट्टू चे ट्रेलर बघा इथे

Website | + posts

Leave a comment