छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारलेल्या ‘फत्तेशिकस्त’ व आगामी ‘जंगजौहर’ या सिनेमांचा युवा संगीतकार ‘देवदत्त मनिषा बाजी’ नव्या धाटणीचं गाणं घेऊन लवकरच आपल्या समोर येतोय. मोरे पिया हे गाण्याचे बोल असून पाश्चात्य इलेकट्रॉनिका व चिलस्टेप लाउंज प्रकारात त्यानं याची सुरावट गुंफली आहे.

विशेष म्हणजे ख्यातनाम संगीतकार ए. आर. रहमान ह्यांच्या ‘स्लमडॉग मिलियनेर’ या ऑस्कर विजेत्या अल्बम मधील ‘मौसम अँड एस्केप’ या गाण्यात आपल्या अप्रतिम सतार वादनाने अवघ्या जगभरात नाव कमावलेले असद खान यांनी देवदत्तच्या मोरे पिया‘ मध्ये देखील आपल्या सतार वादनाचे योगदान दिले आहे.

devdutta baji
Devdutta Baji

महाराष्ट्रीय लोकसंगीतासाठी नावाजलेल्या देवदत्तने या गाण्यातून पारंपरिक व पाश्चात्य प्रकारांचा सुरेख मेळ साधला आहे. या गाण्याला दाक्षिणात्य सिनेमांनाही आपल्या आवाजाने भुरळ घालणारी गायिका आनंदी जोशी हिचा आवाज लाभला आहे. या गाण्याची निर्मिती व शब्दरचना देवदत्तची असून ब्रज भाषेतल्या ओळी श्रुती कुलकर्णी हिने लिहिल्या आहेत.

गाण्याविषयी बोलताना देवदत्त म्हणाला, ‘असद खान व आनंदी जोशी यांच्याबरोबर गाणं करायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर निरनिराळे जॉनर सादर करण्याचा माझा प्रयत्न या गाण्यामुळे साध्य होत आहे.’

Website | + posts

Leave a comment