पंकज त्रिपाठी यांनी आगामी ‘कागज’ चित्रपटातील  १८ वर्षांच्या कालावधीत आपला लूक कसा बदलला याविषयी संवाद साधला.  झी5 च्या आगामी ‘कागज’चे ट्रेलर रिलीज झाल्यापासून रसिकांच्या खूप उत्स्फूर्त व चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. 

‘कागज’ चे कथानक सत्यघटनेवर प्रेरित असून अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी यात लाल बिहारी ही मुख्य भूमिका साकारली आहे, ज्या व्यक्तीला आपण जिवंत असल्याचे सरकारला दाखवायचे आहे, कारण त्याच्या नातेवाईकांनी त्याची संपत्ती मिळवण्यासाठी त्याच्या मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र तयार केले आहे.

kaagaz movie poster

या चित्रपटात सुमारे १८ वर्षांचा काळ दर्शविला गेला आहे आणि पंकज त्रिपाठी यांनी आपल्या लूकबद्दल आणि त्यात केलेल्या बदलाबाबत  सांगताना म्हटले की, “माझ्या लूकमध्ये हा खूपच  सूक्ष्म बदल होता. जोपर्यंत तुम्ही  माझ्या शेवटच्या दृश्याची पहिल्या दृश्याशी तुलना करत नाही तोपर्यंत आपण माझ्यातला बदल ओळखू शकणार नाहीत. “

कागज हा चित्रपट  सलमान खान फिल्म्स आणि सतीश कौशिक प्रोडक्शन्स निर्मित आहे व या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले असून पंकज त्रिपाठी, मोनल गज्जर आणि अमर उपाध्याय हे कलाकार यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

हा चित्रपट ७ जानेवारी २०२१ रोजी झी5 वर प्रदर्शित होईल.  

पहा ‘कागज’चे ट्रेलर –

Website | + posts

Leave a comment