इरॉस नाऊने मोठ्या स्वप्नांसह लहान शहरातील तरुण होतकरू कुस्तीपटूची प्रेरणादायक कहाणी सादर करण्याची घोषणा केली आहे, कठोर परिश्रम करून यशस्वी होण्यासाठी केलेली धडपड महेश मांजरेकर आणि विराट मकादे अभिनीत ‘केसरी’ या चित्रपटामधून १५ जानेवारी २०२१ पासून पाहायला मिळणार आहे.

प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’ जिंकण्यासाठी मेहनत करणाऱ्या एका युवकाचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. सुजय डहाके दिग्दर्शित या चित्रपटामध्ये विक्रम गोखले, रूपा बोरगांवकर, मोहन जोशी, उमेश जगताप, नचिकेत पूर्णपात्रे आदींचा समावेश आहे.

देशातील सर्वात जुन्या ऐतिहासिक खेळाची कुस्तीची ही कहाणी, कुस्ती, केसरी यांचा उल्लेख आला की बलराम हे नाव डोळ्यासमोर येते. ज्यांनी हा सर्वोच्च ‘किताब एक दिवस मिरवला होता आणि आजोबांना समर्पित केला, जे प्रसिद्ध कुस्तीपटू असून त्यांच्यावर महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अंतिम सामना आणि त्यानंतर मॅच फिक्सिंगचा आरोप आहे.

Mahesh Manjrekar in Kesari
Mahesh Manjrekar in Kesari

याबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, “केसरी” हे एखाद्याशी सहजपणे संबंधित होऊ शकणारा चित्रपट आहे. या कथेचा भाग होण्याची आणि बलरामच्या यशाच्या दिशेने मार्गदर्शनासाठी आणि हेतू सध्या करण्यासाठी मेहनत करणाऱ्या मुलाच्या शिक्षकाची भूमिका साकारण्याचा बहुमान मला मिळाला आहे. ओटीटीच्या भरभराटीमुळे, माझा ठाम विश्वास आहे की प्रादेशिक आशयाला प्रोत्साहन देण्यासाठी इरॉस नाऊचे प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहेत.

‘केसरी’ हा प्रेरणादायी चित्रपट नक्की पाहा फक्त इरॉस नाऊवर १५ जानेवारी २०२१ पासून!

Website | + posts

Leave a comment