‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ची (Radhe: Your Most Wanted Bhai) आतुरतेने वाट पाहणाऱ्या सलमान खान आणि त्याच्या सर्व चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, प्रदर्शनाच्या दिवशीचे आकडे अभूतपूर्व आहेत। मागच्या वर्षीपासून, जग उलटे झाले आहे, ज्या चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शनासाठी बनवण्यात आले होते, त्यांना पँडेमिक आणि लॉकडाउनमुळे डिजिटली प्रदर्शित करावे लागले आहे. (The hybrid release format worked well for Radhe:Your Most Wanted Bhai)

सुपरस्टारचा हा चित्रपट देखील याचेच प्रमाण आहे, मात्र त्याने जे केले ते थोडे हटके आहे, त्याने त्याचा चित्रपट हाइब्रिड पद्धतीने प्रदर्शित केला आणि कोणत्याही चित्रपट निर्मात्याने किंवा मंचाद्वारे न चोखाळण्यात आलेला मार्ग त्यांनी चोखाळला जो आतापर्यंतचा एक व्यवहार्य निर्णय ठरला आहे. या कौटुंबिक मनोरंजक चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर मिळत असलेल्या प्रतिसादावरून सलमान खानच्या लार्जर दॅन लाईफ स्टारडमला अधोरेखित केले आहे, जे हिंदी चित्रपटसृष्टीत रजनीकांत यांच्या तोडीचे आहे. दिशा पटानीने देखील या चित्रपटात आपली चमक दाखवली असून ती भारताची ‘द’ ग्लैम गर्ल बनण्याच्या तयारीत असल्याचे सिद्ध केले आहे.

‘राधे’ला जो  प्रतिसाद मिळत आहे, हे आणखी काही नसून, केवळ अभिनेत्याने केलेल्या उदार कार्याचे फलित आहे, जे त्याने समाज आणि गरजू लोकांसाठी आपले कर्तव्य मानून केले आहे, जो राधेला ब्लॉकबस्टर बनवतो आहे. मतितार्थ हा आहे कि, सलमानने ईदसाठी जे वाचन दिले होते, ते कोविडच्या कठीण पार्श्वभूमीवर देखील पूर्ण केले आहे.

Website | + posts

Leave a comment