‘बाटला हाउस’ आणि ‘सुपर 30’ सारख्या हिट चित्रपटांनंतर, मृणाल ठाकुर लवकरच एक्सेल एंटरटेनमेंट आणि आरओएमपी पिक्चर्ससोबत अमेझॉनद्वारा प्रस्तुत राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी ‘तूफ़ान’ चित्रपटात दिसणार आहे. फरहान अख्तर, मृणाल ठाकुर, परेश रावल आणि सुप्रिया पाठक सारख्या कलाकारांसोबत, या स्पोर्ट्स ड्रामामध्ये प्रतिभाशाली कलाकारांची टीम दिसणार आहे. एक अदम्य भावना असणारी एक साधारण लड़की अनन्याच्या भूमिकेत पाऊल ठेवताना, मृणाल आपल्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे बुडून गेली आहे, जी अनेक कारणाने तिच्याशी संबंधित आहे. (Actress Mrunal Thakur talks about her experience working in Toofaan film)

भूमिकेसोबत जोडून घेण्यासोबतच, या स्पोर्ट्स ड्रामाने मृणाल ठाकुरला (Mrunal Thakur) आपली मातृभाषा मराठी मध्ये बोलण्याची संधी दिली आहे. याविषयी बोलताना मृणाल म्हणाली की, “सर्वात चांगली गोष्ट ही आहे की अनन्या आणि मी दोघीही महाराष्ट्रिय आहोत. तुम्ही मला या चित्रपटात मध्ये मध्ये मराठी बोलताना बघाल आणि ते नैसर्गिकरित्या ओघात आलेले आहे. जेव्हा तुमच्यासोबत परेश सरांसारखे कलाकार असतात जे मराठीत प्रतिक्रिया देतात, तेव्हा ती एक छान संवादाची आणि मजेची जागा बनून जाते.”

ती आपली व्यक्तिरेखा अनन्यासारखीच भावुक, उत्साही आणि फैमिली ओरिएंटेड असण्यासोबतच, अभिनेत्री पूर्णपणे आपल्या व्यक्तिरेखेने प्रेरित झाली आहे आणि आपल्या व्यक्तिरेखेतून जे शिकायला मिळाले ते आपल्या वास्तविक जीवनात देखील आणण्याची आशा करते.

मृणाल सांगते की, “माझी व्यक्तिरेखा अनन्या न केवळ अज्जू (फरहान अख्तर/Farhan Akhtar) च्या जीवनात, परंतु त्याच्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनात देखल प्रेरक आहे. ती खूप उदार, समर्पित आणि दूरदृष्टि असलेली मुलगी आहे. ऑफ स्क्रीन, मी अनन्याकडून प्रेरित आहे आणि ज्या तऱ्हेने ती गोष्टी बघते. अनन्याचा समानतेवर विश्वास आहे आणि जीवनातील तिचे उद्द्येष्य लोकांना प्रेरित करणे हे आहे. आता, जेव्हा मी प्रत्येक सकाळी उठते, तेव्हा मी स्वत:ला विचारते कि कसे असेल की मी इतरांना प्रेरित करण्यासाठी जाते आहे. मी एक कलाकार असल्यामुळे हे नाते खरोखरच सौभाग्यशाली समजते, जिथे मी मुक्याचा आवाज बनू शकते आणि माझ्या चित्रपटांच्या मध्यमातून आणि मी निवडलेल्या विषयांच्या माध्यमातून, राष्ट्राला प्रेरित करू शकेन.”

एकाच वेळी हिंदी आणि इंग्रजीत अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रकाशित होणारी तुफान ही पहिलीच फिल्म असून 16 जुलै 2021 पासून भारतासह 240 देश आणि प्रदेशातील प्राईम मेंबरकरिता ती उपलब्ध असेल.

Website | + posts

Leave a comment