झोंबिवलीचे खतरनाक टिझर लॉन्च. बघा इथे!

अमेय वाघ, ललित प्रभाकर व वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका असलेला आगामी मराठी चित्रपट ‘झोंबिवली’ चे टिझर आज लॉन्च झाले आहे. मराठीतला पहिला झोंबी हॉरर चित्रपट ठरणारा झोंबिवलीचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. कमालीचे रंजक व उत्सुकता वाढविणारे असे हे टीझर असून सोशल मीडियावर त्यास रसिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. झोंबिवली हा चित्रपट येत्या ३० एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तृप्ती खामकर व जानकी पाठक यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा व संवाद महेश ऐय्यर, साईनाथ गानूवाड, सिद्धेश पुरकर, योगेश जोशी व नचिकेत सामंत यांनी लिहिले आहेत. 

झॉम्बी आले शहरात, घुसण्या आधी घरात,

गाठा त्यांना, ३० एप्रिलला जवळच्या थेटरात .. अशी या सिनेमाची उत्कंठा वाढविणारी टॅगलाईन आहे  

उलाढाल, सतरंगी रे, नारबाची वाडी, क्लासमेट्स, फास्टर फेणे व माउली या चित्रपटानंतर येणारा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा झोंबिवली, मराठी चित्रपटसृष्टीवर कोरोना नंतर आलेली मरगळ दूर करणारा ठरेल असे टीझर बघून तरी नक्की वाटते. 

बघा टीझर इथे– 

Website | + posts

Leave a comment