आज (२८ मे) स्वातंत्र्यसैनिक आणि हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर म्हणजेच वीर सावरकर यांची १३८  वी जयंती आहे. यावेळी निर्माता संदीप सिंह यांनी घोषणा केली आहे की की आपण वीर सावरकरांच्या आयुष्यावर बायोपिक बनवणार आहोत. ‘स्वतंत्रवीर सावरकर’ (SwatantraVeer Savarkar) असे या चित्रपटाचे नाव आहे. याचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh v Manjrekar) करणार आहेत.

Swatantraveer Savarkar Film Poster

 

आज या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रसिद्ध झाले आहे. यावेळी संदीप सिंह यांनी लिहिले आहे की ‘वीर सावरकरांचा जितका आदर केला जातो तितकीच त्यांच्यावर टीकाही केली जाते. आज त्यांना  ध्रुवीकरण करणारी व्यक्तिरेखा बनविण्यात आली आहे. पण मला असे वाटते की लोकांना त्याबद्दल फारशी माहिती नसते. ते आमच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचा भाग होते हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या आयुष्याची झलक दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘

याप्रसंगी महेश मांजरेकर म्हणतात की, ‘वीर सावरकरांचे जीवन आणि काळ याने मला कायमच मोहित केले आहे. माझे असे ठाम मत आहे की की त्यांना इतिहासात योग्य ते स्थान मिळाले नाही. त्यांनी हजारो लोकांना प्रभावित केले आहे. एक दिग्दर्शक म्हणून मला माहित आहे की हे एक आव्हान असणार आहे परंतु मी ते स्वीकारले आहे’ 

Website | + posts

Leave a comment