‘राधेश्याम’ च्या निर्मात्यांनी प्रभासचे नवे कॅरेक्टर पोस्टर रिलीज केले आहे. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाच्या निर्मात्यांनी शिव-पार्वतीच्या महाकाव्य प्रेमकथेच्या सन्मानार्थ हे पोस्टर सादर केले आहे. तसेच या चित्रपटाबाबत असलेला रसिकांचा उत्साह लक्षात घेऊन निर्मात्यांनी हे पोस्टर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रभास आणि पूजा हेगडे जोडीच्या या पोस्टरमध्ये हे दोघे वेगवेगळ्या दिशेने, बर्फाच्छादित पार्श्वभूमीवर, जमिनीवर पहुडलेले दिसत आहेत. तुमचा मूड रोमँटिक आणि स्वप्नाळू करण्यासाठी हे पोस्टर पुरेसे आहे!

या पोस्टरमध्ये चित्रपटाची भव्यता आणि स्केल दर्शविण्यात आले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण इटली आणि रोममधील नयनरम्य ठिकाणी झाले आहे. अलीकडेच, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी निर्मात्यांनी चित्रपटाची एक झलक मोशन पोस्टरसह प्रसिद्ध केली होती ज्याला रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. 

हा चित्रपट ३० जुलै २०२१ रोजी पडद्यावर येणार आहे. गुलशन कुमार आणि टी-सिरीज द्वारा प्रस्तुत ‘राधेश्याम’ हा राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित बहुभाषिक चित्रपट असून  या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे सोबत  सचिन खेडकर, प्रियदर्शी, भाग्यश्री, मुरली शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.

या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे.

Website | + posts

Leave a comment