सुनिधी चौहान यांच्‍या ‘ये रंजीशें’ला  यश मिळाल्‍यानंतर इंडी म्‍युझिक लेबल SpotlampE ने आता  रॅप परफॉर्मर ह्युमा सय्यद यांचा मराठी रॅप व डान्‍स ट्रॅक ‘रॅपचिक्‍स’ सादर केले आहे. हे अनोखे हिप-हॉप गाणे ‘रॅपचिक्‍स’ (RAPCHICS) २९ एप्रिलपासून SpotlampE च्‍या यूट्यूब चॅनेलवर उपलब्‍ध असेल. हे गाणे म्‍युझिक टेलिव्हिजन चॅनेल ९एक्‍स झकास आणि ९एक्‍सएमवर देखील प्रसारित करण्‍यात येईल.  

‘रॅपचिक्‍स’ हा ह्युमा सय्यद यांनी गायलेला मराठी रॅप व डान्‍स ट्रॅक आहे. संगीतकार वरूण लिखाटे यांनी संगीतबद्ध केलेल्‍या ‘रॅपचिक्‍स’चे अप-टेम्‍पो फूट टॅपिंग म्‍युझिक श्रोत्‍यांना थिरकण्‍यास भाग पाडेल. गीतकार जोडी जय अत्रे व मंदार चोळकर यांनी हे रॅप गाणे श्रोत्‍यांना गुणगुणण्‍यास भाग पाडेल अशाप्रकारे रचले आहे. 

या गाण्‍याबात बोलताना गायिका ह्युमा सय्यद म्‍हणाल्‍या, ”मी रॅप म्‍युझिकप्रेमींसाठी ‘रॅपचिक्‍स’ सादर करण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. युवा व वैविध्यपूर्ण इंडी म्‍युझिक लेबल SpotlampE सोबत सहयोग करण्‍याचा आणि हे अद्वितीय मराठी रॅप गाणे सादर करण्‍याचा आनंद होत आहे. ही संगीतशैली अजूनही अंडररेटेड असून प्रकाशझोतात येणे बाकी आहे. मला विश्‍वास आहे की, SpotlampE सारख्‍या लाँच पॅडच्‍या माध्‍यमातून माझ्या गाण्‍याला व्‍यापक पोहोच मिळण्‍यासोबत संगीतप्रेमींकडून भरपूर प्रेम व प्रशंसा मिळेल.”

गाणे येथे पाहा – 

Website | + posts

Leave a comment